सत्तेत नसता तर एक गल्ली सुद्धा बंद करण्याची धमक तुमच्यात नाही; निलेश राणेंची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडी सरकारच्यावतीने महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात आले. हा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. “सत्तेत नसता तर १ गल्ली सुद्धा बंद करण्याची धमक तुमच्यात नाही., अशी टीका राणेंनी केली आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “३ पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि जेमतेम २५% काही ठिकाणी बंद दिसला, महाविकास आघाडीसाठी लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे कारण सत्तेत असून जर १०० टक्के बंद होत नसेल म्हणजे तुमची काय लायकी आहे यावरून लक्षात येते. सत्तेत नसता तर १ गल्ली सुद्धा बंद करण्याची धमक तुमच्यात नाही.”

महाराष्ट्र बंदवरून काल राजकीय वातावरण चांगलेच तबल्याचे पहायला मिळाले. महाविकास आघाडी विरुद्ध मनसे व भाजप असा चांगला आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला. आता कालच्या आंदोलनानंतरहि ते किती यशस्वी झाले यावरून पुन्हा भाजप व महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे.

Leave a Comment