हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकेरी भाषेत उल्लेख केल्यांनंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी दोन वर्षांपूर्वी सातारा येथे घेतलेल्या सभेवरून शरद पवार यांना टोला लगावला आहे. “दोन वर्षात असंख्य विषय हाताळले असते तर पवार साहेबांचं महाराष्ट्रमध्ये महत्त्व असतं,” असे राणे यांनी म्हंटले आहे.
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, काय झालं जर पवार साहेबांच्या पावसाच्या सभेला २ वर्षे पूर्ण झाली. या २ वर्षात महाराष्ट्र किती वर्ष मागे गेला हे पण सांगा, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना काय मिळालं? महाराष्ट्र १ नंबर फक्त कोरोना मध्ये, असे असंख्य विषय हाताळले असते तर पवार साहेबांचं महाराष्ट्रमध्ये महत्त्व असतं,”
काय झालं जर पवार साहेबांच्या पावसाच्या सभेला २ वर्षे पूर्ण झाली. या २ वर्षात महाराष्ट्र किती वर्ष मागे गेला हे पण सांगा, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना काय मिळालं? महाराष्ट्र १ नंबर फक्त कोरोना मध्ये, असे असंख्य विषय हाताळले असते तर पवार साहेबांचं महाराष्ट्रमध्ये महत्त्व असतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 19, 2021
भाजपकडून सतत या ना त्या कारणांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर टीका केली जात आहे. नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचा एका कार्यक्रमात एकेरी उल्लेख केला. त्यानंतर भाजपच्या चंद्रकांत पाटलांवर टीका केली गेली. आता भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांना सातारा येथील पावसाच्या सभेवरून टोला लगावला आहे.