संजय राठोडनं बिळातून बाहेर येऊन गर्दी केली तेव्हा कोरोनाची भीती वाटली नव्हती काय? निलेश राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) आजपर्यंत मौन बाळगलेले मंत्री संजय राठोड(Minister Sanjay Rathod) यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच भाष्य केले आहे, पोहरादेवी गडावर जाऊन संजय राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, यावेळी मोठ्या प्रमाणात संजय राठोड समर्थकांनी पोहरादेवी गडावर गर्दी केली होती. याच मुद्द्यावरुन माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विटरद्वारे महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

“शिवजयंतीला शिवनेरीवर 144 कलम लावणारे ठाकरे सरकारला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात असलेले संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले आणि गर्दी करून फिरले. त्यावेळी महाभकास आघाडीला कोरोनाची भिती वाटली नाही. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ आहे”, असा घणाघात निलेश राणे यांनी केला.

नेमकं काय म्हणाले होते संजय राठोड ?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. ते म्हणाले, ”बंजारा समाजातील मुलगी पूजा चव्हाण या तरूणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला, या मृत्यूचा बंजारा समाजाला दु:खं झालंय, मात्र या प्रकरणावरून जे घाणेरडे राजकारण केले जातंय, ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे, मी मागासवर्गीय समाजाचं, ओबीसी, भटक्या कुटुंबातून येऊन नेतृत्व करतो त्यामुळे माझ्या सामाजिक, राजकीय जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार या माध्यमातून केला जात आहे, या प्रकरणाचा माझा काहीही संबंध नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तपासाचे आदेश दिलेत, या चौकशीत सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, पण माझी बदनामी करण्यासाठी घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, माझी, कुटुंबाची अन् समाजाची बदनामी करू नका, चौकशीतून जे काही सत्य आहे ते समोर येईल” असं राठोड यांनी सांगितले.

तसेच मागील १५ दिवसांपासून माझं काम सुरूच होतं, माझ्याबद्दल टीव्हीवरचं प्रेम पाहत होतो, या दिवसात शासकीय काम मुंबईच्या बंगल्यातून सुरू होतं, माझ्या कुटुंबातील आई-वडिल, पत्नी, मुला-बाळांना धीर देत होतो, त्यांना सांभाळण्याचं काम केलं, आज या पवित्र भूमीत येऊन पुन्हा मी माझ्या कामाला सुरूवात करणार आहे. पोलीस चौकशी सुरू आहे, या तपासातून सत्य बाहेर येईल, अरूण राठोड कोण मला माहिती नाही, सोशल मीडियात जे काही फोटो व्हायरल होत आहेत, माझ्यासोबत अनेक लोक फोटो काढतात, सर्वांना सोबत घेऊन मी काम केलं आहे, एका घटनेने मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावरील आरोपाचं स्पष्टीकरण दिलं आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

Leave a Comment