हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकावर भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जाऊ लागला आहे. आज भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकावर हल्लाबोल केला. “मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा काढला जात नसल्याने आता 58 मोर्चे काढणाऱ्या आमच्या मराठा बांधवांवर 59 वा मराठा मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मराठा बांधवानी या संदर्भात भूमिका घ्यावी आणि सरकारने निर्णय घेतला नाही तर पुन्हा राज्यभर मोर्चे काढू,” असा इशारा राणे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून आज पुन्हा भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करीत ठाकरे सरकावर निशाणा साधला. राणे यांनी म्हंटले आहे की, महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले आहे. त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केले पाहिजे.
५९ वा मराठा मोर्चा काढण्याची वेळ आता आलेली आहे… pic.twitter.com/gdNhHHaFew
— nitesh rane (@NiteshNRane) November 24, 2021
आज मराठा समाजाच्या तरुण-तरुणींना आवाहन आहे की, मराठा क्रांती मोर्चाचा काळ परत आणावा लागेल, या सरकारला झुकवल नाही तर हे गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत. आतापर्यंत 58 मोर्चे काढले असतील आता आमच्या मराठा मुलांनी मराठा बांधवांवर ५९ वा मराठा मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे. तो काढण्याबाबत मराठा समाजातील बांधव व मुलांनी भूमिका घ्यावी. या ठाकरे सरकारला आर्यन खानची चिंता आहे पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही, अशी घणाघाती टीका राणे यांनी केली.