आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय; नितेश राणेंची घणाघाती टीका

0
43
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून भाजप व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गंभीर आरोप केले जात आहे. दर ड्रग्ज प्रकरणावरून मलिक यांच्यावरही आरोप केले जात आहेत. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “93 च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवले. आता त्यांचाच मुलगा 93 दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगतोय. खरं तर आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय,” अशी टीका राणेंनी केली आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी नवाब मलिक यांच्याकडून होत असलेल्या आरोपावरून शिवसेना प्रामुख्य तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, 93 च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवले आहे. आता त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 93 दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगत आहेत. खरं तर आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे. कोणीतरी शिवसैनिक आता गोमूत्र शिंपडण्याचे काम करणार का? त्यांना जमत नसेल तर मीच काही दिवसात बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाऊन गोमूत्र शिंपडनार आहे, असा इशारा राणेंनी दिला आहे.

भाजप नेते नितेश राणे यांच्याकडून अनेक कारणांनाही शिवसेना व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. आज नितेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here