एक-एक आमदार की किमत तुम क्या जानो…; ‘बस बाई बस’ कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी मारला डायलॉग !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची एक मुलाखत पार पडली. तेव्हा त्यांना “एक चुटकी सिंदुर की किमत तुम क्या जानो रमेशबाबू” या ऐवजी “एक-एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोधबाबू”, असा डायलॉग म्हणत अभिनय करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या स्टाईलमध्ये डायलॉग सादर केला. त्यांच्या या डायलॉग व अभिनय कौशल्याची चांगलीच चर्चा सध्या होऊ लागली आहे.

‘बस बाई बस’ या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मारलेला डायलॉग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या कार्यक्रमात अनेक सेलीब्रिटींसह राजकीय क्षेत्रातील नेत्यांना आमंत्रित केले जात आहे. या ठिकाणी ते राजकीय परिस्थिती तसेच आपल्या खासगी आयुष्याबाबत भाष्य करताना दिसत आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे.

https://www.instagram.com/reel/ChHA7KvjO3r/

या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक कबुलीही दिली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, होय मी विरोधीपक्षातील नेत्यांना फोडलंय. माझे बाबा गोपीनाथ मुंडेसाहेब यांनी मला सांगितलंय की कायम बेरजेचं राजकारण करायचं वजाबाकीचं नाही. त्यामुळे इतर पक्षात चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी फोडलंय. बीड जिल्ह्यात झालेलं पक्षांतर त्याचंच द्योतक आहे.

https://www.instagram.com/reel/ChHsMbvDHE0/

 

नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीत येणं हे त्याचंच उदाहरण आहे. शिवाय सुरेश धसही भाजपत आले. त्यामुळे पक्षाच्या वाढीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी इतर पक्षातील चांगल्या नेत्यांना पक्षात आमंत्रित करते, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पक्षफोडीची कबुली दिली आहे. बस बाई बस या कार्यक्रमाचा निवेदक सुबोध भावे याने तुम्ही कधी इतर पक्षातील नेत्यांना फोडलं आहे का?, असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिले आहे.

‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात यापूर्वी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सहभाग घेतला आहे.