हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचीही आज ईडीकडून याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. यावरून विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका करताना म्हंटल आहे कि, खडसे यांची सीडी कुठे गेली आहे? त्यांची सीडी आज असती तर ते आतापर्यंत थांबले नसते. खडसेंनी तपासाला सहकार्य करावे, असे दरेकर यांनी म्हंटल आहे.
भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आता वाढ झाली असून त्यांना याप्रकरणी ईडीकडून समन्स देण्यात आला आहे. दरम्यान त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनाही ईडीने कारवाई करीत अटक केली. यावर भाजपकडून टीका केली जात आहे. भाजपचे नेते दरेकर यावेळी म्हणाले कि, खडसेंकडून हूल मारण्याचे काम केले जात असावे. त्यांच्याकडे जर सीडी असती तर त्यांनी थंबने महत्वाचे समजले असते.
यावेळी दरेकर यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही प्रतिउत्तर दिले. राऊत यांना राणेंचं खात हे छोटंच वाटणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांना राणेंची उंची माहिती होती. त्यामुळे त्यांनी राणेंना मुख्यमंत्री बनवलं होत. आता नवीन खात मिळाले असल्यामुळे ते कशाप्रकारे सांभाळतील हे येणाऱ्या काळात पहावे लागेल, असे दरेकर म्हणाले.