आघाडी सरकारकडून आरक्षणाबाबत केवळ दिखावा; ओबीसी आरक्षणावरून दरेकरांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान आज भाजप नेते प[रवीं दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकार व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. “न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला अनेकदासूचना केल्या, आठवण करून दिली कि ओबीसी आरक्षणाच्याबाबतीत प्रक्रिया पूर्ण करा, मात्र, या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे न्यायालयाला आपला निर्णय घ्यावा लागला, ओबीसींच्यासाठी अध्यादेश काढून आरक्षणाबाबत केवळ दिखावा करण्याचे काम या सरकारने केले आहे, अशी टीका विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ज्यांच्या जीवावर नेतृत्व केले, ज्यांच्या जीवावर राजकारण केले, पदवी मिळवली, त्या ओबीसींसाठी काही आपण करू शकत नाही, या हतबलतेने छगन भुजबळ यांच्याकडून भाजपवर टीका केली जात आहे. खरे सांगायचे झाले तर या महाविकास आघाडी सरकारची मानसिकताच ओबीसींबाबत बरोबर नाही. देशाचे पंतप्रधान ओबीसी समाजाचे आहेत. ओबीसींच्यासाठी भाजप एकमेव पक्ष म्हणून रस्त्यावर उतरला, तीव्र स्वरूपाची आंदोलनेही केली आणि समाजाला न्याय देण्याचे कामही भाजप करणार असल्याचे दरेकर यांनी म्हंटले.

गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव सांगून आपल्या संस्कृतीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करू नका. आत्ता त्यांच्याशी एकत्रितपणे समान किमान कार्यक्रम अंगलट येतोय, हे आता लक्षात यायला लागले आहे. मुस्लिम आरक्षणबाबत या सरकारची भूमिका सांगायची झाली तर तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे कर अशी महाविकास आघाडीची गत झाली आहे. कोणत्याही गोष्टीचे खापर भाजपवर फोडायचे, अशी टीका दरेकरांनी केली आहे.

Leave a Comment