मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असताना राज ठाकरे यांनी राज्यपालांना भेटणे अयोग्य आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर भाजपनं पलटवार केला आहे. ‘मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री न्याय देत नाहीत, मुख्यमंत्र्यांनी कामं केली तर नेत्यांना आणि सामान्यांना राज्यपालांची भेट घेण्याची गरज नाही,’ असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना व ठाकरे सरकारला लगावला आहे.
राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली होती. त्यावर, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही पलटवार केला आहे. ‘आपण म्हणजे महाराष्ट्र या भ्रमातून बाहेर येण्याची गरज आहे’, असा टोला त्यांनी लगावला आहे.
‘राज्यातील प्रत्येक नागरिक म्हणजे महाराष्ट्र आहे. राज्यातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर राज्य सरकारकडे मिळत नाही. म्हणून सगळे राज्यपालांना भेटत आहे. राज ठाकरे हेसुद्धा याच भावनेतून राज्यपालांना भेटले. याआधीही महाराष्ट्रातील नेते राज्यपालांना भेटले आहेत. नेते राज्यपालांकडे का जातात याचं आत्मपरिक्षण करावं,’ अशी टीका दरेकर यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in