हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आगामी २०२४ च्या निवडणुकीत कोणता पक्ष सत्तेवर येणार? याबाबत राजकीय वर्तृकात आतापासूनच चर्चा रंगली आहे. या निवडणुकीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता फेटाळून लावली. त्यांच्या शक्यतेवर भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टोला लगावलेला आहे. आमचं स्वप्न २०२४ ला पूर्ण करू, असा टोला दानवे यांनी लगावला आहे.
रावसाहेब दानवे यांनी म्हंटल आहे की, अशा प्रकारचा प्रश्न कुणाला पडला आणि कुणाला अशी स्वप्न पडतात ते आम्हाला माहीत नाही. पण कोणत्याही प्रकारचे दिवा स्वप्न पाहायचे नाही, हे भाजपने ठरवले आहे. इतरांनी अशी स्वप्ने अनेक वर्षे पाहिली आहेत, असा चिमटा काढतानाच आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.
आम्ही २०२४ च्या निवडणुकीत आमचं स्वप्न पूर्ण करू, असे दानवे यांनी म्हंटले आहे. भाजपनेते व नेत्यांकडून सध्या २०२४ च्या निवडणुकीवरून सत्ता स्थापनेचे दावे केले जात आहेत. यावरून एकमेकांवर टीकाटिप्पणी हि केली जात आहे. यावर भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे खासदार राऊत यांनी वर्तवलेल्या अंदाजावर प्रतिक्रिया दिली आहे.