माळशिरस | प्रतिनिधी
कोणत्याही परिस्थितीत माढा जिंकायचेच असा चंग बांधलेल्या भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने काट शहाचे राजकारण खेळण्यास सुरुवात केले आहे. माढा मतदारसंघात येणाऱ्या माळशिरस तालुक्यातून १ लाखाचे मताधिक्य भाजपला देण्याच्या तयारीत असणाऱ्या मोहिते पाटलांना शहा देण्यासाठी राष्ट्रवादीने कट्टर भाजप समर्थक सुभाष पाटील यांना आपल्या गळाला लावण्यात यश मिळवले आहे.
सुभाष पाटील हे भाजपचे जुने नेते आहेत. त्यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघ खुला असताना विजयसिंह मोहिते पाटील यांना भाजपमधून नेहमीच टक्कर दिली आहे. त्यामुळे सुभाष पाटील हे मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक म्हणून संपूर्ण जिल्ह्याला ज्ञात आहेत. सुभाष पाटील यांनी भाजपकडून जिल्हा परिषदेवर देखील प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनाच आपलेसे करण्याचा प्रयत्न आता राष्ट्रवादीने केला आहे.
माळशिरस तालुक्यातील उत्तर भागात सुभाष पाटील यांचे चांगले प्रस्थ आहे. त्याचे रुपांतर संजय शिंदे यांच्यासाठी मतदानात करण्याचा घाट राष्ट्रवादीने घातला आहे. सुभाष पाटील राष्ट्रवादीत गेल्याने माळशिरस तालुक्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. त्याच प्रमाणे मोहिते पाटील यांच्या एकछत्री अंमलाला कोठे तरी खीळ देखील बसली आहे.
माढा लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
आंबेडकर- शिंदे यांच्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण
म्हणून झाली सुप्रिया सुळेआणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट
अमरावती : बच्चू कडू देणार शिवसेनेला पाठिंबा ?
शरदराव तुम्हाला झोप कशी येते, मोदींचा पवारांना सवाल
पिळदार मिशी न्हवे तर स्वकर्तृत्व हे पुरुषार्थाचं लक्षण – उदयनराजे भोसले