राज्य सरकारने अदानीला छत्रपती शिवरायांचे नाव झाकण्याची संधी दिली आहे का? शेलार यांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहुचर्चीत असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात अदानी यांच्या नावाने फलक लावण्यात आला होता. तो शिवसैनिकांनी तोडफोड करीत काढून टाकला. यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यावेळी अदानीचा ठराव पारीत करून राज्य सरकारने अदानीला छत्रपती शिवरायांचे नाव झाकण्याची संधी दिली आहे का? असा सवाल शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज धुळे जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर व राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. यावेळी शेलार यांनी मुंबईच्या विमानतळाच्या नावाबाबत मत व्यक्त केले. यावेळी शेलार म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे नाव कुणीही हटवू शकत नाही. ते नाव भाजपच्या काळातच देण्यात आलेले आहे. त्याचा ठरावही राज्य सरकारने पारीत केलेला आहे.

यावेळी शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याही नावाचा उल्लेख करीत निशाणा साधला. मलिक हे अदानीचे जवळचे मित्र आहेत. त्यांनी हिंमत असेल तर ठराव रद्द करावा, असे आव्हानच यावेळी शेलार यांनी राज्य सरकारला दिले. भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिलेल्या आव्हानाला महाविकास आघाडी सरकारकडून काय उत्तर दिले जाणार हे पाहावे लागणार आहे.