छत्रपतींची बदनामी करण्याचे लायसन्स राष्ट्रवादीला मिळालेय का ?; आशिष शेलारांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी चक्क घोड्यावर चढून हार घातल्याचा प्रकार घेतला. यामुळे नवा वाद निर्माण झाला असून यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा निशाणा साधला. “छत्रपतींची बदनामी करण्याचे लायसन्स राष्ट्रवादीला मिळालेय का ?,” असा सवाल शेलार यांनी केला आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार राजू नवघरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र डागले. यावेळी ते म्हणाले की, हिंगोली येथील वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 14 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचे वसमत शहरात आगमन झाले असता त्यावेळी राजू नवघरे यांनी छत्रपतींच्या घोड्यावर चढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घातला.

अशा प्रकारचे जे काही कृत्य राजू नवघरे यांनी केले आहे. त्यांच्या या कृत्याबद्दल राष्ट्रवादीच्या या आमदारावर पक्ष काय कारवाई करणार हे पक्षाने सांगावे. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या आमदाराबद्दल आता मुख्यमंत्री काय करणार आहेत? त्यांनी या प्रकाराबद्दल बोलावे, अशी मागणीही यावेळी शेलार यांनी केली आहे.

Leave a Comment