हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सध्या पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं असून विरोधक आणि राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान याच प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना धमक्यांचे फोन आल्यानंतर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्यालाही धमकीचे फोन आल्याची तक्रार केली आहे. समता नगर पोलिस चौकीत ही तक्रार केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अशा प्रकारच्या धमक्यांना आम्ही घाबरणारे नाही, असं आव्हान भातखळकर यांनी धमकीचे फोन करणाऱ्यांना दिलं आहे.
अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान यानंतर आपल्याला धमक्या मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे”, असा इशाराच भातखळकर यांनी ट्विटरवरुन दिलाय.
पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे.
धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @OfficeofUT— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 15, 2021
पूजा चव्हाण प्रकरणात भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात आल्यामुळे, या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. त्यानंतर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ आणि आता अतुल भातखळकर यांनाही धमकीचे आले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’