शिवसेनेने मराठी अस्मिता ड्रग्ज माफियांवरून ओवाळून टाकलेली; अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरणावरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून आरोप केले जाताहेत. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि मलिकांवर हल्लाबोल केला आहे. “शिवसेनेने मराठी अस्मिता ड्रग्ज माफियांवरून ओवाळून टाकलेत दिसते,” अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून ठाकरे सरकार निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ठाकरे सरकारचा एक मंत्री ड्रग्ज माफियांची सुपारी घेतो आणि शिवसेना त्याचे निर्लज्ज समर्थन करते तीही एका मराठी अधिकाऱ्याच्या. इतकी लाळ चाटेगिरी करण्यासाठी किती वसूली केली?शिवसेनेने मराठी अस्मिता ड्रग्ज माफियांवरून ओवाळून टाकलेली दिसते?, असा सवाल भटखळकर यांनी केले आहे.

केंद्र सरकार ठाकरे सरकारच्या वाटमारीवर पांघरूण घालेले अशी अपेक्षा करू नका. केलेली वाटमारीही घशात हात घालून सरकारी तिजोरीत जमा केली जाईल. सामनातून कितीही ठणाणा केलात तरी गांजाच्या व्यवहारात नवाब मलिक यांचे जावई सापडेल आहेत, असे भातखळकर यांनी म्हंटले आहे.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून ड्रग्ज प्रकरणात करण्यात येत असलेल्या कारवाईवरून व त्याबाबत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून वानखेडे यांच्यावर सोडल्या जात असलेल्या निशाणावरून भातखळकर यांनी ट्विट करीत टीका केली आहे.

Leave a Comment