हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काहीही झालं तरी राज्यात परत भाजपची सत्ता येऊन देणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हणल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. पावसात भिजूनही तुमच्या आमदारांची संख्या ५४ च्या वर गेली नाही. तुम्ही देशातील राजकारणाच्या गोष्टी करता मग महाराष्ट्रात आत्तापर्यंत तुम्हाला राष्ट्रवादीचा नेता मुख्यमंत्री का करता आला नाही याचे उत्तर राज्यातील लोकांना द्या असे पडळकरांनी म्हंटल
पडळकर म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना आणि मित्रपक्ष मिळून लोकांच्या समोर गेलो. फडणवीसांना पुन्हा महाराष्ट्रातील लोकांनी मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी भाजपाचे १०६ भाजपाचे आमदार आणि जवळपास ५५ शिवसेनेचे आमदार असे एकूण १६१ आमदार निवडून दिल्याचे आपण बघितले. परत तुम्ही विश्वासघात केला. सत्तेमध्ये आलात पण राज्यातील जनता आजही फडणवीस यांचं नेतृत्व मानते आणि भाजपासोबत आहे,” असं पडळकर म्हणाले आहेत.
तुम्ही किती जरी संघर्ष केला, आम्ही काहीतरी मोठे आहोत असं वातावरण तयार केलं तरी २०१९ ला साताऱ्यात पावसात भिजून सुद्धा तुम्हाला ५४ च्या वर जाता आलं नाही. तुम्हाला भाजपची काळजी करायचे कारण नाही. देशातील, राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करता मग तुमचा पक्ष स्थापन झाल्यापासून तुम्हाला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का बसवता आला नाही याचं उत्तर तुम्ही राज्यातल्या लोकांना द्या असे पडळकर यांनी म्हंटल