सोलापूर । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला दुसऱ्यांच्या लग्नात नाचायची सवय आहे. भारतीय जनता पार्टी ही सामान्य कार्यकर्त्यांची पार्टी आहे. अन्यथा गोपीचंद पडळकर आमदार झाला नसता, असं वक्तव्य पडळकर यांनी केलं आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत पडळकर बोलत होते.
पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र दिक्षित यांच्या प्रचारासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पंढरपुरात होते. त्यावेळी माजी मंत्री सुभाष देशमुख, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा दिला. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका कराल तर याद राखा, त्याच पद्धतीनं उत्तर मिळेल, अशा इशारा पडळकर यांनी दिला आहे.
रावसाहेब दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार हे माहितीचं नव्हतं! सरकार स्थापनेच्या 'त्या' विधानावर शरद पवारांचा टोला
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/mvGcizf2QW@raosahebdanve @PawarSpeaks @NCPspeaks #HelloMaharashtra @BJP4Maharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 24, 2020
अखेर भाजपाला सोडचिट्ठी दिलेल्या जयसिंगराव गायकवाडांनी बांधलं हातावर घड्याळ; NCP मध्ये केला प्रवेश
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/B1CdAOJmV3@BJP4Maharashtra @PawarSpeaks @NCPspeaks #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 24, 2020
काँग्रेसमधील तरुण नेतृत्व भाजपकडे आले, तर त्यांना घेऊन सरकार स्थापन करू!- चंद्रकांत पाटील
वाचा सविस्तर👉🏽 https://t.co/gwD47XIyJY@ChDadaPatil @BJP4Maharashtra @INCMaharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 24, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’