हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडी सरकारच्यावतीने महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात आले.त्यावर टीका केल्यानंतर आज शेतकऱ्यांच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “शरद पवार साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही,आज शेतकरी खरा भिजला आहे,” असे पडळकर यांनी म्हंटले आहे.
भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची हाक असे म्हणत “शरद पवार साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही,आज शेतकरी खरा भिजला आहे,” अशी टीकाही केली आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची हाक
“शरद पवार साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही,आज शेतकरी खरा भिजला आहे”…#BJPMaharashtra #CMOMaharashtra #Mahavikasaghadi #Shivsena #Osmanabad pic.twitter.com/GTLlaVR51z— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) October 12, 2021
महाराष्ट्र बंदवरून काल राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळाले. यावेळी आमदार पडळकर यांनी ट्विट करून महाराष्ट्रबं दवर टीका केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत मुळात तुम्हाला काकाचं दु:ख सतावत आहे. कारण पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची किड साफ करायला घेतली आहे. त्याचेच पित्त झाल्यामुळे हा महाराष्ट्र बंदचा देखावा करण्यात आला असल्याचे पडळकर यांनी म्हंटले होते. त्यानंतर आज पुन्हा शेतकऱ्यांच्या नुकसानीवरून पडळकरांनी पवार यांच्यावर निशाणा साधला आहार.