Monday, February 6, 2023

संभाजीनगर करु म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यात जास्त आनंद मिळतोय; गोपीचंद पडळकरांची टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांकडून महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीका केली जाते. त्यांनी आज आपला निशाणा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर साधला आहे. “जनाब संजय राऊत तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरून उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नसेल. औरंगाबादला संभाजीनगर करु म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय असे दिसत आहे, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या ट्विटमधून शिवसेना खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “जनाब संजय राऊत तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरून उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नसेल. औरंगाबादला संभाजीनगर करू म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीची पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय.”

- Advertisement -

यावेळी पडळकरांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवरही टीका केली. ते म्हणाले की, तुमच्या आघाडी सरकारमधील मंत्री स्वातंत्र्यवीर सावकरकांवर उलटसुटल लिहितात. त्यावेळी सत्ता टिकवण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का? औरंगाबादेत गरोदर महिलेवर अत्याचार होतो. तरी त्यावर आपल्याला एक ओळ खरडावी वाटत नाही. महाराष्ट्रात औरंगजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहिली जाते आणि त्यावरुन उस्मानाबादेत दंगे होतात. तुमचा महाराष्ट्रातील कमकुवतपणा आणि लाचारी लपवण्यासाठीच तुम्ही भाजपला हिंदुत्व शिकवणारे मोठे मोठे लेख लिहिता.