महाविकास आघाडीला फक्त वसुलीत रस; म्हाडाच्या परीक्षेवरून पडळकरांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत माहिती दिली आहे. दरम्यान या परीक्षेवरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडी सरकारला फक्त वसुली करण्यात रस आहे. त्यांना बहुजनांच्या पोरांच्या भविष्याची काळजी नाही. प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा हिशोब न चुकता एक्सेल शीटमध्ये घेतात. मात्र त्यांना बहुजन मुलांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडाच्या परीक्षेकडे लक्ष द्यायला वेळ नाही,असा टोलाही पडळकर यांनी लगावला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “गृह निर्माण खात्याचा दर आठवड्याला न चुकता हिशोब ठेवणाऱ्यांना म्हाडाच्या भरतीबाबत मात्र लक्ष द्यायला वेळ नाही.जर घोटाळ्याची पूर्व कल्पना होती, गृहखातेही राष्ट्रवादीकडेच आहे तर त्यांना रात्री दिड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली? जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा हिशोब न चुकता एक्सेल शीटमध्ये घेतात. मात्र, त्यांना बहुजन पोरांच्या भविष्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

म्हाडाच्या नोकरभरती परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचे ते स्व:चा गेल्या आठवड्यापासून सांगत आहेत. एक-एक पैसा गोळा करून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. आजच्या या निर्णयामुळे त्यांचा भ्रमनिरास झाल्याची टीका यावेळी पडळकर यांनी केली.

Leave a Comment