Satara News : धनगर आरक्षणप्रश्नी राज्यसरकार सकारात्मक; लवकरच…; आ. गोपीचंद पडळकरांचे महत्वाचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी आदोलने सुरु आहेत. धनगर आरक्षणाच्या प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्वाच्या तीन तारखा देण्यात आलेल्या आहेत. यावेळी अंतिम सुनावणीत न्यायालयाचा निर्णय सकारात्मक म्हणजे धनगर समाजाच्या बाजूने येईल. दरम्यान, बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेश सरकारने वेगवेगळ्या अनुसूचित जाती आणि जमातींच्या संदर्भात अध्यादेश काढले आहेत. ते सरकारकडे दिले असून प्रशासकीय अधिकारी आणि धनगर समाजाच्या प्रतिनिधींची टीम त्या राज्यांमध्ये पाठविण्याचे निश्चित केले असल्याचे विधान धनगर समाजाचे प्रमुख नेते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कराड येथे केले.

महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी कराड येथे गेल्या चौदा दिवसांपासून दि. २६ सप्टेंबरपासून धनगर समाजातील जयप्रकाश हुलवान उपोषणास बसले होते. त्यांच्या उपोषणस्थळी आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/977675316628526

यावेळी आमदार पडळकर म्हणाले की, धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. त्याची दखल घेत आज सातारा येथे जिअधिकार्यालयात महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैंठकीस धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नांसह इतरही महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस धनगर समाजाचे शिष्ट मंडळ उपस्थित होते. सरकारच्या वतीने जयप्रकाश हुलवान यांना वनंती करण्यात आली कि महाराष्ट्र सरकार धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर सकारात्मक पाऊले उचलत आहेत. जाणीव त्याचाच भाग म्हणून कोर्टात सरकारच्या वतीने तीन वेगवेगळ्या स्वेउपाची तीन ऍफेडेव्हिट दाखल करण्यात आलेली आहेत. आजच मुंबई उंचच न्यायालयात धनगर समाजाच्या आरक्षणाची तारीख होती.

आज न्यायाधीशांनी ८, ११ आणि १५ डिसेंबर या धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नांवर अंतिम सुनावणी घेण्याच्या तारखा दिलेल्या आहेत. या तीन दिवसात कोर्टासमोर फक्त धनगर समाजाच्या प्रश्नी सुनावणी होईल. नंतर याबाबत निकाल येईल. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारकडे मागणी केली आहे की, इतर राज्यात वेगवेगळ्या जाती आणि अनुसूचित जातीच्या बाबतीत तेथील राज्यसरकारने काही जीआर काढलेले आहेत. आणि त्यामध्ये प्रामुख्याने बिहार, तेलंगणा, आणि मध्यप्रदेश या राज्य सरकारने काढलेले जीआर आम्ही राज्य सरकारकडे दिलेले आहेत. यावरून सरकारने त्याबाबतीत सकारात्मक पाऊले उचलून प्रशासकीय अधिकारी व धनगर समाजाचे प्रतिनिधी यांची एक टीम त्या त्या राज्यात पाठवण्याचे निश्चित केले आहे. उद्या किव्हा पर्वा मुंबईत याबाबतीत शिष्टमंडळात कोण असावे, कोन नसावे हे निशिच्त केले जाईल.

सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या हिशोबाने सकारात्मक आहे. म्हणून आम्ही जयप्रकाश हुलवान यांना विनंती केली आणि त्यांनी राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती गोळा केली आहे. कराड येथे आज त्यांची भेट घेतली आणि उपोषण सोडण्याची विनंती केली. आणि त्यांनी आज उपोषण सोडले असून धनगर समाज नेहमी त्यांच्या ऋणामध्ये राहील, असे आमदार पडळकर यांनी म्हंटले.