जयंत पाटील गुणवत्ता नसताना अनुकंपा निकषावर राजकारणात आलेत; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका

सांगली । जयंत पाटील हे गुणवत्ता नसताना राजकारणात आले आहेत. लोकनेते राजाराम बापू यांच्या निधनानंतर राजकारणात आलेले अनुकंपा निकषावर राजकारणात आले आहेत, अशी बोचरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. गोपीचंद पडळकर सांगलीत आले असता त्यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, ”जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र आहे. जयंत पाटील राजारामबापूच्या जागेवर अनुकंपाच्या जागेवर गुणवत्ता नसताना राजकारणात आलेले आहेत,” अशी खोचक टीका पडळकर यांनी केली. राष्ट्रवादीचे प्रदेशध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर पडळकर यांना प्रतिक्रिया व्यक्त केली असता त्यांनी पाटील यांना घेरले.

जयंत पाटील राष्ट्रवादीतून मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही. जयंत पाटलांना यूनोमध्ये वगैरे पाठवता येत का हे पवार साहेबांनी पाहायला पाहिजे. कारण ते फार बुद्धिमान आहेत, असा त्यांच्या पक्षाचा समज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like