हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बारा आमदारांच्या नियुक्तीवरून निशाणा साधला. त्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर निशाणा साधला. शरद पवारांचे ओबीसीप्रती प्रेम उफाळून आलेय, यामागचा हेतू काय? ते कोणतंही काम कोणत्या हेतूशिवाय करत नाहीत,” असा टोलाही यावेळी पडळकरांनी लगावला आहे.
पडळकर म्हणाले की, ” शरद पवारांचे अचानकपणे ओबीसी प्रेम आज उफाळून आले आहे. ते कुठतेही काम हेतूशिवाय करत नाहीत आणि त्यांचा खरा हेतु कधी दाखवतही नाहीत. केंद्र सरकारने ताट वाढले हे खरे आहे. तुमचे हात पण बांधले गेले आहेत तेही खरे आहे. पण हे हात कुणामुळे बांधले गेले? केंद्रामुळे की आपल्या पै पाहुण्यांच्या प्रेमामुळे. जेव्हा जेव्हा तुम्ही सत्तेचा भाग बनलात तेव्हा आपल्या करामतीने मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण घालवले, असा आरोपही यावेळी पडळकरांनी पवारांवर केला.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ओबीसी आरक्षणावरून पवारांनी टीका केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांना टोला लगावला आहे. दरम्यान पवारांच्या टोल्याला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.