हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मागील अनेक महिन्यापासून ते आजारी होते.
पुण्यातील खासगी रुग्णालयात लक्ष्मण जगताप यांच्यावर उपचार सुरू होते. अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे आमदार जगताप यांच्या प्रकृतीत नुकतीच सुधारणा झाली होती. इंजेक्शन दिल्यानंतर ते खुर्चीत बसू व काही पावले चालूही लागले होते. शिवाय विधान परिषद निवडणुकीसाठी जगताप मुंबईला मतदानासाठी देखील गेले होते. मात्र, आज त्यांचे निधन झाले.
पिंपळे गुरव येथील (पिंपरी चिंचवड) रहिवासी असलेले लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द काॅंग्रेस पक्षापासून सुरू झाली. १९९२ च्या निवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले. १९९७ च्या निवडणुकीतही ते निवडून आले. सलग दहा वर्षे त्यांनी पिंपळे गुरवचे प्रतिनिधित्व केले. १९९८ मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती.
भाजप आमदार लक्ष्म जगताप थेट अँम्ब्युलन्समधून विधान भवनात दाखल ; मतदानाचा हक्क बजावणार
१९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ या कालावधीत त्यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भुषविले. मात्र, २००३-०४ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला.