मुंबई । पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारमधील एक मंत्री संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यावरुन भाजपनं ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अशा वेळी भाजप आमदार नितेश राणे यांनीही संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केला आहे. तसंच, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या आत्महत्येवरुन आदित्य ठाकरे यांना घेरलं आहे.
नितेश राणे यांनी एक ट्वीट केलं आहे. या महाविकास आघाडी सरकारची दूरदृष्टीला सलाम. यांना माहित होते. पर्यावरमंत्र्यांची ‘दिशा’ चुकली मग आता वनमंत्री ‘पूजा’ घालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत. बाकी मंत्र्यांचे पण ‘कहानी घर घर की’ चालू आहे. म्हणूनचजेल पर्यटन चालु केले असावे, असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावला आहे.
या महाविकास आघाडी सरकारची दूरदृष्टीला सलाम!
यांना माहीत होते..
पर्यावरणमंत्र्या ची "दिशा"चुकली..
मग आता वनमंत्री "पूजा ”घालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत..
बाकी मंत्र्यांचे पण "कहानी घर घर की" चालू आहे..
म्हणूनच “जेल पर्यटन"चालू केले असावे!
जनता मंत्र्यांना अजुन कुठे भेटणार ?— Nitesh Rane (@NiteshNRane) February 14, 2021
दरम्यान, बीड जिल्ह्यातील परळीची रहिवाशी असलेल्या पूजा चव्हाण हिने सोमवार, ८ फेब्रुवारी रोजी पुण्यात एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप झाले. मात्र, पूजानं मानसिक तणावातून व आर्थिक तणावातून आत्महत्या केल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.