हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप आमदार योगेश वर्मा यांच्या स्कॉर्पिओने दुचाकीस्वार भावांना उडवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी स्कॉर्पिओ कार आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र या अपघातावेळी आमदार योगेश वर्मा मात्र गाडीमध्ये नव्हते अशीही माहिती समजत आहे
मिळालेल्या माहितीनुसार, रवी आणि मनीष असं मृत झालेल्या दोन्ही भावांची नावे आहेत. दोघेही खेरी पोलीस स्टेशन हद्दीतील किरतपूर गावातील रहिवासी आहेत. ते काही कामानिमित्त रामापूर येथे आले होते आणि घरी परतत असताना हा अपघात झाला. भरधाव स्कॉर्पिओ गाडीने चिरडल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला.
Correction | UP: Two bike-borne men were killed after their bike collided with a car on Bahraich highway. The vehicle is said to be of Sadar MLA (Yogesh Verma). We've taken both the driver and vehicle into our custody. Further probe underway: ASP* Lakhimpur Kheri AK Singh (17.04) pic.twitter.com/ceCtHmPtgq
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 18, 2022
अपघाताच्या वेळी भाजप आमदार कारमध्ये उपस्थित नव्हते
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्कॉर्पिओ गाडीचा चालक मुनेंद्र याला ताब्यात घेतले. स्कॉर्पिओ कार भाजप आमदार योगेश वर्मा यांची असून, त्यांची पत्नी नीलम वर्मा यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा हा अपघात घडला त्यावेळी आमदार योगेश वर्मा कारमध्ये उपस्थित नव्हते. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात अशी ग्वाही तिरिक्त पोलीस अधीक्षक अरुण सिंह यांनी दिली आहे