हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय जनता पार्टीच्या खासदार प्रीतम मुंडे (pritam munde) यांनी आपली मोठी बहीण पंकजा मुंडेंबाबत एक मोठे विधान केले आहे. “सगळे घाव झेलायला ताई आणि मलई खायला मी आहे,” असं विधान प्रीतम मुंडे (pritam munde) यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले आहे.
काय म्हणाल्या प्रीतम मुंडे?
“आज ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हा भारतीय जनता पार्टीचा नारा आहे. पण हा नारा प्रत्यक्षपणे 40 वर्षे ज्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात एक व्यक्ती जगली. ती व्यक्ती म्हणजे गोपीनाथ मुंडे. माझा जन्म त्यांच्या घरी झाला, त्यामुळे माझ्याइतकं भाग्यवान कुणी नाही, असं मला वाटतं. त्यापेक्षा माझं (pritam munde) मोठं भाग्य म्हणजे माझा जन्म पंकजाताईंच्या पाठीवर झाला. कारण सगळे घाव झेलायला ताई आहे आणि त्याची सगळी मलई खायला मी आहे,” असं विधान प्रीतम मुंडे यांनी केलं.
तसेच त्या पुढे म्हणल्या, आयुष्यात संघर्ष करा, कष्ट करा, हे गोपीनाथ मुंडेंच्या घरी जन्मलेल्या मुलींनी व्यासपीठावर बसून सांगू नये, असं काहींना वाटत असेल. पण माझा येथे बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्न आहे. ठीक आहे… आम्ही नशिबवान आहोत. कारण माझा किंवा राहुल कराडचा आमच्या घरी जन्म झाला. पण गोपीनाथ मुंडे कुठल्या मोठ्या माणसाच्या घरी जन्मले नव्हते किंवा विश्वनाथ कराड कुठल्या दिग्गज माणसाच्या घरी जन्मले नव्हते.”“त्यामुळे तुम्हाला राहुल कराड व्हायचंय की विश्वनाथ कराड व्हायचंय हा तुमचा निर्णय आहे. तुम्हाला प्रीतम मुंडे (pritam munde) व्हायचंय की गोपीनाथ मुंडे व्हायचंय हा तुमचा निर्णय आहे. तुम्ही ठरवलं तर तुम्ही गोपीनाथ मुंडे किंवा विश्वनाथ कराड का होऊ शकत नाही? ही जिद्द मनाशी बाळगा आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा, असं केलंत तर तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल,” असे प्रीतम मुंडे नाशिक येथे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणल्या आहेत.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय