भाजपपुढे आपला निभाव लागणार नाही म्हणून पवारांनी माढ्यातून माघार घेतली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. माढा लोकसभा मतदार संघात भाजप पुढे आपला निभाव लागणार नाही हे कळल्या नंतर शरद पवारांनी माढ्यातुन माघार घेतली असा टोला त्यांनी लगावला. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा समावेश असणाऱ्या शायनिंग महाराष्ट्र या महाप्रदर्शनाच्या समारोप आणि भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार शुभारंभ लॉन्स येथे केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.

रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा शरद पवार आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मला आणि जयकुमार गोरे यांना वेळोवेळी अडचणीत आणण्याचे काम केलेले आहे. मात्र मी कच्या गुरूचा चेला नसून आत्तापर्यंत सर्वाना पुरून उरलो आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये तर शरद पवार पूर्वी निवडून गेले होते. परंतु भाजपच्या उमेदवारापुढे आपला टिकाव लागणार नाही हे कळल्यानंतर त्यांनी माघार घेतली. असे रणजितसिंह निंबाळकर यांनी म्हंटल.

दरम्यान फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांची तहान भागवणे हे मी माझे कर्तव्य समजतो असे म्हणत जनतेला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही रणजित सिंह निंबाळकर यांनी दिली. आगामी काळामध्ये मुंबईवरून हैदराबादकडे जाणारी बुलेट ट्रेन फलटण व अकलुज मार्गे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच माढा लोकसभा मतदार संघ विकासात आघाडीवर असेल असे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

Leave a Comment