लावालावी करायचं काम त्याचं नाव ‘संजय राऊत ; राणेंचा प्रहार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर तोफ डागली. संजय राऊत नक्की शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत असा सवाल करत लावालावी करायचं काम त्याचं नाव ‘संजय राऊत’ अशी टीका नारायण राणे यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

नारायण राणे म्हणाले, संजय राऊत हे राष्ट्रवादीत आहेत की शिवसेनेत आहेत तेच कळत नाही. त्यांचे नेते कोण, शरद पवार की उद्धव ठाकरे? दिल्लीत पवार साहेबांच्याच कार्यालयात ते असतात. पक्षाशी त्यांची निष्ठा नाही. ते पक्षाशी प्रामाणिक नाहीत. ते आव आणायचं काम करत आहेत. ते दाखवतात तसे ते नाहीत. ते जसं बोलतात तशा भाषेत वृत्तपत्राचा संपादक अशा भाषेत बोलू शकत नाही. ते कधी होते शिवसेनेत? काय केलं?… हे लावालावी करायचं काम, त्याचं नाव संजय राऊत.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले-

भाजपाला देशाचे ऐक्य नको आहे शरद पवारांनी २५ वर्षापूर्वी सांगितले आणि आम्हाला दोन वर्षापूर्वी थोडे लक्षात आले. ते तेव्हापासून सांगत आहेत की भाजपा देशाचे तुकडे करत आहे. भाजपा देशाला उलट्या दिशेने नेत आहे आणि आम्हाला आता ते कळायला लागले आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले होते.