राष्ट्रवादीने राजकारण करू नये, ईडीची कारवाई राजकीय नाही – नारायण राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ईडी कारवाईला भाजपला जबाबदार धरल्यानंतर आता भाजप नेते नारायण राणे यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. राष्ट्रवादीने यावर राजकारण करू नये असं नारायण राणे यांनी म्हंटल आहे.

करावे तसे भरावे या प्रमाणे आता भरण्याची वेळ आली आहे असा टोला त्यांनी लगावत आता जे केलं त्याची चौकशी चालू आहे असं नारायण राणे यांनी म्हंटल. ईडीची कारवाई ही राजकीय कारवाई नाही त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने तर यावर राजकारण करूच नये. हे आरोप सिद्ध झाले की मग बघूया असंही राणें म्हणाले. जे काही गुन्हे घडले आणि अटक झालेल्या लोकांनी जी काही माहिती दिली त्या आधारांवर चौकशी सुरू आहे असे नारायण राणे यांनी म्हंटल.

देशमुखांची रवानगी जेलमध्ये होणार – सोमय्या

दरम्यान, अनिल देशमुखचा घरी आज ED ई डी चे छापे काही दिवसांनी जेल मधे रवानगी होणार. घोटाळ्याचा पैसा कोलकत्ता कंपन्या द्वारा स्वतःचा कंपन्या मधे वळविला. छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्या मुळे ३ वर्ष जेल मधे होते. काही दिवसांनी अनिल परबची अशीच अवस्था होणार असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हंटल.

Leave a Comment