Sunday, June 4, 2023

पिसाळलेल्या कुत्र्यासारखे भाषण करायचं आणि नंतर …; राणेंची भास्कर जाधवांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा हिवाळी अधिवेशनात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची नक्कल केल्यानंतर भाजप आक्रमक झाली असून भाजप नेते निलेश राणे यांनी भास्कर जाधवांवर निशाणा साधला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यासारखे भाषण करायचं आणि नंतर माफी मागायची ही जाधव ची जुनी सवय आहे अशी टीका त्यांनी केली.

निलेश राणे यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, काल शिवसेना आमदार भास्कर जाधव ने उगाच स्वतःचं ढुंगण शेकून घेतलं, पिसाळलेल्या कुत्र्यासारखे भाषण करायचं आणि नंतर माफी मागायची ही जाधव ची जुनी सवय. इतकी भीती वाटते तर लायकीत राहून तोंड उघडायचं, त्याला माहित असावं माफी नाही मागितली तर फटके मिळतील म्हणून शहाणा झाला.

भास्कर जाधव यांची बिनशर्त माफी-

दरम्यान, भास्कर जाधव यांनी मोदींची नक्कल केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक होत भास्कर जाधव यांना निलंबित करण्याची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणानंतर विधानसभेत गदारोळ झाला. यानंतर भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली. माझ्या बोलण्याच्या वेळी नकळत हातवारे होतात. मी नक्कल केली. मात्र, मी असंसदीय शब्द उच्चारलेले नाहीत. अध्यक्ष महोदय तुमच्या सूचनेनुसार मी बिनशर्त माफी मागत आहे, यानंतरही देवेंद्र फडणवीस माझ्याविरोधात हक्कभंग आणणार असतील तर मी त्यासाठी तयार असल्याचेही भास्कर जाधव यांनी म्हटले.