महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात; राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

0
34
Nilesh Rane Uddhav Thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधिमंडळ अधिवेशन सध्या सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्बेतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात. अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. यावेळी राणे यांनी गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर परिकर यांचा दाखला दिला आहे

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर परीकर मुख्यमंत्री असताना त्यांचे निधन झाले. पण 1 दिवससुद्धा घरी बसले नाही. कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी झुंजत असताना त्यांनी कधी कामामध्ये तडजोड केली नाही, शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात. अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे विरुद्ध राणे असा वाद नव्याने पाहायला मिळत आहे. परवाच भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समोर म्याव म्याव असा आवाज काढत डिवचण्याचा प्रयत्न केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here