हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी चक्क घोड्यावर चढून हार घातल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राजू नवघरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार राजू नवघरे या हरामखोराला भर चौकात फटके टाकले पाहिजे असं राणे म्हणाले आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादीवाल्याना मस्ती आली आहे, यांची जिरवल्या शिवाय पर्याय नाही. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा. औरंगजेबच्या औलादी आहेत ह्या पक्षात. असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार राजू नवघरे या हारामखोरला भर चौकात फटके टाकले पाहिजे. राष्ट्रवादीवाल्याना मस्ती आली आहे, यांची जिरवल्या शिवाय पर्याय नाही. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा. औरंगजेबच्या औलादी आहेत ह्या पक्षात. pic.twitter.com/nf3AyNJR6P
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) October 14, 2021
काय आहे प्रकरण-
हिंगोली येथील वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 14 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं वसमत शहरात आगमन झालं त्यावेळी राजू नवघरे यांनी भावनेच्या भरात थेत घोड्यावर चढून शिवरायांना हार घातला. नवघरे यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नवघरे यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि शिवप्रेमींनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केलाय.