हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून आक्रमक झालेल्या नरेंद्र पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष केल्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली. पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा अशा शब्दांत त्यांनी अजितदादांना खडेबोल सुनावलं आहेत.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा, असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 7, 2021
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते-
अजित पवारांनी माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. कायदा आणि संविधान बघत नाहीत. ही लोकं काही काळ आमच्यासोबत होती. त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, असे अजित पवार यांनी म्हटल होत.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.