हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरातमध्ये भाजपने संपूर्ण मंत्रिमंडळ बदलल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर टीका केली होती. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील असा टोला शिवसेनेने लगावल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
‘संज्या तू तर जिथे गेलास तिथे शिवसेनेचं तोंड काळं झालं, तरी तू शिकत नाही. देशाच्या प्रत्येक राज्यात BJP आहे पण शिवसेना एकाच राज्यात आहे ती पण फक्त २०%… २०२४ निवडणुकी नंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही. संज्या तू एक निवडणूक तरी लढव बाकी राहू दे,’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
संज्या तू तर जिथे गेलास तिथे शिवसेनेचं तोंड काळं झालं, तरी तू शिकत नाही. देशाच्या प्रत्येक राज्यात BJP आहे पण शिवसेना एकाच राज्यात आहे ती पण फक्त २०%… २०२४ निवडणुकी नंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही. संज्या तू एक निवडणूक तरी लढव बाकी राहू दे. https://t.co/YmSXLyA9Gg
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 18, 2021
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल-
मोदी हाच भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे व बाकी सारे फाटके मुखवटे आहेत. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील. मोदी यांना स्वतःचे हे बलस्थान माहीत असल्यामुळेच त्यांनी 2024 च्या तयारीसाठी साहसी पावले टाकायला सुरुवात केली आहे, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.