शरद पवारांनी आता तरी शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे प्रयत्न सोडावे- निलेश राणेंची टीका

0
49
Nilesh Rane Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याला शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. त्यामुळे या कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी पवारांवर टीका केली आहे. शरद पवार कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत? असा परखड सवालत्यांनी केला.

यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केले आहे की, ‘इतके वर्ष केंद्रात मंत्री राहून त्यातले अनेक वर्ष देशाचे कृषिमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी आता तरी शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे प्रयत्न सोडावे. आज कृषी दिनानिमित्त प्रश्न पडतो की जर पवार कृषी तज्ज्ञ व इतके वर्ष कृषीमंत्री राहिले तरी महाराष्ट्राचा शेतकरी समाधानी का नाही?

शरद पवार नेमकं काय म्हणाले –

पंजाब, हरियाणा आणि राजस्थानातील शेतकरी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारसोबत त्यांच्या नऊ दहा बैठका झाल्या. त्यात तोडगा निघाला नाही. त्यामुळे ते उठायला तयार नाहीत. त्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते योग्य नाही. त्यासाठी दुरुस्ती विधेयक सरकारनं आणलं पाहिजे. ते अधिक चांगलं होईल, असं पवार म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here