मुख्यमंत्री शिवसेनेचा, पण संजय राऊत भांडी घासतो पवारांची; राणेंचा निशाणा

raut rane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने छापेमारी केल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. या सर्व घडामोडी नंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा देत अपना टाइम आयेगा अस म्हंटल. त्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला.

संज्या राऊत म्हणतो अपना टाईम आयेगा… मुख्यमंत्री शिवसेनेचा, भांडी घासतो पवारांची तरी याला वाटत नाही याचा टाईम आला आहे. संजय राऊत ने स्वतःची नाही तर उद्धव ठाकरे यांची लायकी दाखवली आहे. सत्तेत असून सुद्धा उद्धव ठाकरे मध्ये दम नाही याचा हा अर्थ होतो. अस ट्विट निलेश राणे यांनी केलं.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले-

एखाद्या कुटुंबावर राजकीय कुटुंबावर अशाप्रकारे दहशत निर्माण करणारी छापेमारी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर सुरू आहे. हेही दिवस निघून जातील, दिल्लीत आमचेही दिवस येतील, अपना टाईम भी आयेगा, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.