हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते संजय राऊत यांनी वापरलेल्या एका शब्दाला भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजपने केली आहे. याच दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ही निशाणा साधला.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, आज संज्याने लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये शेलक्या शिव्या घातल्या पण त्यावर आक्षेप कोणी घ्यावा? पवार इतर वेळेला दुसऱ्यांची संस्कृती काढतात पण संज्याला काही बोलणार नाहीत कारण त्यांचा घरगडी आहे, उद्धव ठाकरे बोलणार नाही कारण शिवसेनेला अधून मधून शेण खायला संज्या लागतो.
आज संज्याने लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये शेलक्या शिव्या घातल्या पण त्यावर आक्षेप कोणी घ्यावा? पवार इतर वेळेला दुसऱ्यांची संस्कृती काढतात पण संज्याला काही बोलणार नाहीत कारण त्यांचा घरगडी आहे, उद्धव ठाकरे बोलणार नाही कारण शिवसेनेला अधून मधून शेण खायला संज्या लागतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 9, 2021
तर दुसरीकडे संजय राऊत आपल्या शब्दावर कायम आहेत. मी वापरलेला शब्द असंसदीय नाही. तो शब्द योग्यच आहे. काय तक्रार करायची ती करा, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे.मी वापरलेला शब्द असंसदीय नसून त्याचा अर्थ अनेक ठिकाणी मूर्ख, पढत मूर्ख, शतमूर्ख असाच आहे. पण हे लोक ते समजून घेत नाहीत, असा चिमटा राऊतांनी काढला.