अजित पवार साहेब जे तुम्हाला जमणार नाही ते बोलू नका कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही ; निलेश राणेंचा पुन्हा एकदा अजितदादांवर प्रहार

nilesh rane ajitdada
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार निलेश राणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणा नंतर निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेस वर तोफ डागली होती. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना निलेश राणेंना टोला लगावला होता. निलेश राणे वाट्टेल ते बोलतात, त्यावर मी व्यक्त व्हायचं का? निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं.

दरम्यान काल बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठीभाषक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचं  मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणं, हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सीमालढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले होते. त्यावर निलेश राणे यांनी अजित दादांना टोला लगावला आहे.

अजित पवार साहेब जे तुम्हाला जमणार नाही ते बोलू नका. ती गावं महाराष्ट्रात आलीच पाहिजे पण तुम्ही ते करू शकत नाही कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही. इतक्या वर्षात त्या गावांना भेट देण्याकरिता कधी गेलात का? अजित पवार सीमाभागात कधी गेले हे त्यांनी जाहीर करावं असं आव्हान राणेंनी अजितदादांना दिलं आहे. त्यामुळे निलेश राणेंच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं गरजेचे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’