हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील पाच वर्षे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तेत होतो पण आम्हाला गुलामासारखी वागणूक मिळाली असा धक्कादायक दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत आणि शिवसेनेला लक्ष्य केले आहे. खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच सवय शिवसेनेची कायम राहिली आहे अशा शब्दांत राणेंनी शिवसेनेवर टीका केली आहे.
संज्या राऊत म्हणतो भारतीय जनता पक्षाने एकत्र सत्तेत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक दिली पण शिवसेना गुलामगिरी सहन करत नाही. पाच वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता उपभोगली, खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच सवय शिवसेनेची कायम राहिली आहे. काही तरी लाज शिल्लक असू द्या रे असे ट्विट निलेश राणे यांनी केले.
संज्या राऊत म्हणतो भारतीय जनता पक्षाने एकत्र सत्तेत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक दिली पण शिवसेना गुलामगिरी सहन करत नाही. पाच वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता उपभोगली, खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच सवय शिवसेनेची कायम राहिली आहे. काही तरी लाज शिल्लक असू द्या रे.
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) June 13, 2021
संजय राऊत नेमकं काय म्हणाले –
राज्यात युतीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण गेल्या पाच वर्षात शिवसेना संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. शिवसेना सत्तेत असतानाही गावोगावी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला गेला. पाच वर्षे सत्तेत होतो. पण सत्तेत असूनही गुलाम होतो. गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.




