तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही; राणेंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर राजकारण पेटण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर हे ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर दगडफेड झाल्याची घटना घडली. दरम्यान या घटनेनंतर भाजप नेते निलेश राणे यांनी विरोधकांना गंभीर इशारा दिला आहे. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, असा इशाराच निलेश राणे यांनी दिला आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, हे लक्षात असू दे. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही अशा शब्दांत निलेश राणे यांनी इशारा दिला.

नक्की काय घडलं

सोलापूर दौऱ्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत गाडीवर भला मोठा दगड टाकून संबंधिताने तिथून पळ काढला. पडळकर समर्थकांनी मोटारसायकलवर पाठलाग केल्यानंतर सुद्धा दगडफेक करणारा हाती लागला नाही.

 

Leave a Comment