हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम; राणेंची टीका

nitesh rane uddhav thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आल्यानंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी दुकानांच्या वेळही वाढवून दिल्या आहेत, परंतु राज्यातील मंदिरे मात्र अद्याप बंदच आहेत या पार्श्वभूमीवरून भाजप आमदार नितेश राणे पुन्हा एकदा ठाकरे सरकार वर टीका केली आहे. हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे अशी टीका नितेश राणे यांनी केली

2 दिवसात लोकल चालू ..17 ऑगस्ट पासून शाळा चालू ..मग 2 डोस घेतलेल्यांना .. मंदिर दर्शन का नाही ???हे सरकार नाक दाबल्या शिवाय काहीच करत नाही का ?? हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे !!! असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्यातीलकाही जिल्हे सोडून निर्बंध शिथिल करण्यात आले. ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे, त्या ठिकाणी काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. असं असलं तरी चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मॉल्स सुरू करण्यास परवानगी असली तरी मॉल्समधील मल्टीप्लेक्स बंद ठेवण्यात येणार आहेत. यासाठी कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. तसंच राज्यातील सर्व धार्मिक स्थळेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.