Wednesday, June 7, 2023

“नवाब मलिक हाय हाय”; मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचे आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अनेक कारणांनी चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार असल्याचे सांगितले. दरम्यान, आज अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी चहापाण्यावर बहिष्कार टाकत विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन केले.

आज विधानसभेचे अर्थसंकल्पी अधिवेशनास सुरुवात होत आहे. काल चहापानावर बहिष्कार टाकलेल्या विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवरच आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यात यावा अशी विरोधकांनी घोषणाबाजीही यावेळी केली

यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी भाजपाकडून पायऱ्यांवर आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला. नवाब मलियांचा राजीनामा झाला पाहिजे. असे म्हणत दाऊदच्या दलाल मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नवाब मलिक देशाचे गद्दार असल्याच्या आशयाच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. एकंदरीत नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुन अधिवेशनापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे.