जोपर्यंत नवाब मलिक राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत…; दरेकरांचा इशारा

Malik Darekar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी घोषणाबाजी केली. जोपर्यंत नवाब मलिक राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहील असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. दाऊद टोळीशी संबंध ठेवणाऱ्यांना आणि संरक्षण देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो, अशा प्रकारचे फलक घेऊन भाजप पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत. दरम्यान, जोपर्यंत मलिक राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहणार, असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरेकर म्हणाले, नवाब मलिक यांचे संबंध देशद्रोह्यांसोबत आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशा प्रकारची आमची मागणी आहे. जोपर्यंत नवाब मलिक राजीनामा देत नाहीत आणि किंबहुना ठाकरे सरकार त्यांचा राजीनामा घेत नाहीत. तोपर्यंत सरकारला आम्ही काम करून देणार नाही.