मराठा आरक्षणाप्रती तुमच्या दुर्लक्षपणाचा बुरखा महाराष्ट्रासमोर आम्हीच टराटरा फाडू; दरेकरांचा सचिन सावंत यांच्यावर पलटवार

sachin sawant darekar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणावरून भाजपची पोलखोल करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही सचिन सावंत यांचा समाचार घेतला आहे.

ज्यांच्यासाठी बाजू मांडताय त्यांची आता एव्हढी लाज निघालीय ना मराठा आरक्षणाबाबत सचिन सावंतजी, थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल ‘पोलखोल’ च्या नादात स्वपक्षाची आणि महाविकास आघाडीचीच लक्तरं तुम्ही वेशीवर टांगत आहात,’ असा हल्लाबोल प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

बाकी विषय भरकटवण्यात तुम्ही, काँगेस आणि तुमचे सहकारी पक्ष यांचा हात कुणी धरू शकणार नाही. भाजपची पोलखोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल याचा सल्ला सरकारला द्या.

राहता राहिला प्रश्न ‘पोलखोलचा’ तर… महाविकास आघाडीचा मराठा आरक्षण न देण्याचा ‘नियोजनबद्ध दुर्लक्षपणाचा बुरखा’ आपल्या पोलखोलीनंतर मराठा बांधव आणि महाराष्ट्रासमोर आम्हीच टराटरा फाडू,’ असं प्रतिआव्हानही प्रवीण दरेकर यांनी काँग्रेसच्या सचिन सावंत यांना दिलं आहे.

सचिन सावंत नक्की काय म्हणाले होते-

कंगना राणावतला भेटणारे पंतप्रधान संभाजीराजे छत्रपती यांना का भेटत नाहीत? या साध्या प्रश्नाचे उत्तर प्रवीण दरेकर आणि भाजपाला देता येत नाही. असो! उद्या पुन्हा मी भाजपची पोलखोल करुन मराठा आरक्षणाविरुध्द भाजपाचा कुटील डाव उघड करणार आहे. त्याही प्रश्नापासून पळ काढतात का? ते पाहू’, असं ट्वीट करत सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.