महाविकास आघाडी सरकारच जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना ; दरेकरांचा राऊतांवर पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचा उल्लेख ब्लॅक भंगस असा केल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. यवरून आता भाजप कडूनही जोरदार प्रत्युत्तर येत असून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांवर आणि ठाकरे सरकार वर निशाणा साधला आहे. जर आम्ही म्हटलं की मविआ सरकारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे तर संजय राऊत यांना आवडेल का?, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला आहे.

श्रीमान संजय राऊत म्हणतात विरोधक ‘ब्लॅक फंगस’ आहेत! पण, त्यांना हे ठाऊक नाही की हे अख्ख सरकारच जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना असून पक्ष तीन असले तरी यात कितीतरी विविध प्रकारचे ‘म्युटंट’ आहेत. असे ट्विट प्रवीण दरेकर यांनी केलं आहे

महाविकास आघाडी सरकारला केवळ भ्रष्टाचाराचा ‘ब्लॅक फंगस’ चिकटलेला नाही, तर राजरोस पोलिसी वसुलीच्या ‘व्हाईट फंगस’चाही रोग जडलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञ डॉक्टरांच्या ‘कंपाऊंडर’ला एवढेही ठाऊक नसावे ?आश्चर्य आहे! असा टोला त्यांनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

 

Leave a Comment