शिवसेनेचे सगळेच ‘संजय’ बेशिस्त, आधी राऊत नंतर राठोड आणि आता…; भाजपचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्या नंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरून भाजप आमदार संजय कुटे यांनी गायकवाड यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत आणि माजी वनमंत्री संजय राऊत याना देखील टोला लगावला आहे.

संजय कुटे यांनी ट्विट करत म्हंटल की शिवसेनेचे सगळेच ‘संजय’ बेशिस्त आहेत, यात आता कसलीही शंका उरली नाही. आधी राऊत, नंतर राठोड आणि आता संजय गायकवाड अशा शब्दात भाजपा आमदार संजय कुटे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.

संजय गायकवाड यांनी नक्की काय म्हंटल

संजय कुटेसारखे आमदार दारू पिऊन वावरात पडलेले असतात. त्याला सर्व शौक आहे तो मवाली आहे. तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर ५० मीटर माझ्या जवळ येऊन दाखव तुला संजय गायकवाड काय आहे ते दाखवतो अशी धमकी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भाजपा आमदार संजय कुटे यांना दिली आहे.

You might also like