नवी दिल्ली । हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे. नुकतंच प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांचं भूमिपूजन केलं आहे. देशात रामराज्य आणण्याचा वचन दिलं आहे. मात्र हाथरसमध्ये घडलेली घटना त्यानंतर पोलिसांच्या कारवाईबाबत समोर आलेलं प्रश्नचिन्ह या सगळ्यामुळे योगी सरकार आणि भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे असं उमा भारती यांनी म्हटलं आहे. उमा भारती यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत त्यांचं मत मांडलं आहे.
योगी आदित्यनाथ हे एक पारदर्शी सरकार चालवणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रसारमाध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून अडवू नये असंही आवाहन उमा भारती यांनी केलं आहे.
“मी करोना वॉर्डमध्ये अत्यंत अस्वस्थ आहे. मी करोना पॉझिटिव्ह नसते तर आज त्या गावातील त्या पीडितेच्या कुटुंबीयांसोबत त्यांच्या घरी बसलेले असते.” असंही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे मी तुमच्या मोठ्या बहिणीसारखी आहे त्यामुळे तुम्ही माझा सल्ला ऐकावा असंही आवाहन उमा भारती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केलं आहे.
वह एक दलित परिवार की बिटिया थी । बड़ी जल्दबाज़ी में पुलिस ने उसकी अंत्येष्टि की और अब परिवार एवं गाव की पुलिस के द्वारा घेराबंदी कर दी गयी है ।
— Uma Bharti (@umasribharti) October 2, 2020
५)हमने अभी राम मंदिर का शिलान्यास किया है तथा आगे देश में रामराज्य लाने क़ा दावा किया है किन्तु इस घटना पर पुलिस की संदेहपूर्ण कार्यवाही से आपकी, @UPGovt की , तथा @BJP4India की छवि पे आँच आयी है ।
— Uma Bharti (@umasribharti) October 2, 2020
६)आप एक बहुत ही साफ़ सुधरी छवि के शासक है । मेरा आपसे अनुरोध है कि आप मीडियाकर्मियों को एवं अन्य राजनीतिक दलो के लोगों को पीड़ित परिवार से मिलने दीजिये ।
— Uma Bharti (@umasribharti) October 2, 2020
७)मै @BJP4India में आपसे वरिष्ठ एवं आपकी बड़ी बहन हू । मेरा आग्रह है की आप मेरे सुझाव को अमान्य मत करियेगा ।
— Uma Bharti (@umasribharti) October 2, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.