नितीन राऊत तुम्ही काय झोपा काढत आहात का? ; चंद्रकांत पाटलांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना पुण्यात घडली. एका अल्पवयीन मुलीची कोयत्याने वार करुन हत्या केल्याचा प्रकार घडला. या घटनेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “पूर्वी महिला रात्री कितीही उशिरा घरी यायच्या एवढ्या सुरक्षित होत्या. पण आता त्या सुरक्षित राहिलेल्या नाहीत. आता काय नितीन राऊत काय झोपा काढत आहेत काय? राऊत यांना गुन्हेगारी दिसत नाही का?, असा सवाल पाटील यांनी विचारला आहे.

भाजप नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तेव्हा खुट्ट जरी झालं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शहरात पाकिटमारी असं चालायचं. राज्यात महिला असूरक्षित झाल्या आहेत. घरातल्या कुणाला तरी बरोबर घेतल्याशिवाय बाहेर पडता येत नाही.

आता कुठे गेल्या सुप्रिया सुळे या का आता बोलत नाहीत?, त्या महिला आहेत ना. त्यांना जसे माझ्या काळात रस्त्याचे खड्डे दिसायचे. त्या सेल्फी काढायच्या. त्यांना हे सर्व बलात्कार आणि कोयत्याने वार केलेले दिसत नाहीत का?, निलमताई कुठे आहेत? त्या तर महिलांच्या अन्यायावर खूप बोलायच्या, अशी टीका पाटील यांनी यावेळी केली.

Leave a Comment