हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणाचा वाद हा सध्या महाराष्ट्रात चांगलाच पेटलेला आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून एकमेकांवर राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या मुद्यांवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत राज्यात पहिले तर राज्य सरकारचा नाचता येईना अंगण वाकडे असा प्रकार आहे. राज्य सरकारने मागास आयोग नेमला, मात्र त्याला पुरेसे संसाधने या सरकारला पुरवता आली नाहीत. त्यामुळे सरकारने आतातरी या विषयावर सर्वपक्षीय बैठक घेण्याची हिम्मत दाखवावी, अशी टीका पाटील यांनी केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून राज्य सर्कावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटद्वारे म्हंटले आहे की, “आजच्या स्थितीमध्ये सुप्रीम कोर्टाने किमान एवढं तरी अपेक्षित आहे की, अगॉसर्पासून जे ओबीसी आहेत. ओबीसींचा हा प्रकार म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा प्रकार आहे. राज्य सरकारने मागास आयोग नेमला, मात्र त्याला पुरेसे संसाधने तुम्हाला पुरवता आली नाहीत. सरकारच्या अशा कृत्यांमुळे कित्येक सदस्यांनी राजीनामा दिला.
हा नाचता येईना अंगण वाकडे असा प्रकार आहे. राज्य सरकारने मागास आयोग नेमला, मात्र त्याला पुरेसे संसाधने तुम्हाला पुरवता आली नाहीत. सरकारच्या अशा कृत्यांमुळे कित्येक सदस्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सरकारने आतातरी या विषयावर सर्वपक्षीय बैठक घेण्याची हिम्मत दाखवावी. pic.twitter.com/V96juLjMar
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 8, 2021
सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि भाजप कोणत्याही प्रकारचे राजकारण करत नाही. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत या सरकारला का अजून उमजत नाही. त्यामुळे सरकारने आतातरी या विषयावर सर्वपक्षीय बैठक घेण्याची हिम्मत दाखवावी. आणि ओबीसी आरक्षण व्यतिरिक्त निवडणूक घेणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर करावे. पुन्हा एकदा सर्वांसमोर चर्चा करावी. आणि दुध का दुध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, असे पाटील यांनी सांगितले.